“महाराष्ट्रभूषण”च्या निमित्ताने
August 27th, 2015 | by Sandeep Patil
पुरंदरे प्रकरणाला पार्श्वभूमी आहे ती महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची. हा वाद काही फार मोठा कडवा वाद म्हणून ओळखला जात नाही , यातून काही जन्माची वैरे वगैरे तयार झालेली नाहीत. काहीसा कडूगोड, बराचसा निरुपद्रवी असे वर्षानुवर्षे या वादाचे सर्वंकष स्वरूप राहिले आहे.
